जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीसाठी लवकरच बैठक

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील फलोदे येथील गावातील जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रांताधिकारी अजीत देशमुख यांनी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सरपंच मनीषा मेमाणे यांनी दिली.
तालुक्‍यातील विविध शासकीय कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी फलोदे येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फलोदे गावातील ग्रामस्थ, गावच्या सरपंच मनिषा मेमाणे, उपसरपंच मनोहर मेमाणे, माजी सरपंच अशोक पेकारी इत्यादी सहलीत सहभागी झाले होते. यावेळी प्रांतधिकारी देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी फलोदे गावाचा सामूहिक वनहक्क दावा मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यानंतर पिंपळगाव येथे भेट देऊन तेथील जलशुद्धीकरण प्रकल्प, जिल्हा परिषदेची शाळा, ग्रामपंचायत यांची पाहणी करून या प्रकल्पांची व संस्थाची माहिती घेण्यात आली.
भीमाशंकर आयुर्वेदीक हॉस्पिटलची पाहणी करून याचे प्रमुख डॉ. शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी प्रलंबित नळपाणीपुरवठा योजना, सावरली रस्ता, वांगान तळे बांधकाम इत्यादी प्रश्‍नांविषयक चर्चा झाली. या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्यासोबत बैठक होणार आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेऊन विकास साधला जाईल, असे डॉ अमोल वाघमारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)