‘जलयुक्त शिवार’चे साडेसात हजार कोटी कुठं मुरले? : काँग्रेस

मुंबई: काँग्रेसने आज राज्यभरामध्ये जलसंधारणासाठी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आपल्या आरोपाला पुरावा म्हणून २०१४, २०१५ आणि २०१८ या तीन वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील टँकर्सची संख्या व त्या वर्षीचे पर्जन्यमान याची आकडेवारी सादर केली आहे.

काँग्रेसने सादर केलेल्या आकडेवारी नुसार :


२०१४ मध्ये पर्जन्यमान ७०.२% असताना नोव्हेंबर महिन्यात ७१ टँकर्स सुरु होते 


२०१५ मध्ये पर्जन्यमान ५९.४% असताना नोव्हेंबर महिन्यात ६९३ टँकर्स सुरु होते


(२०१५ ते २०१८ दरम्यान ७,७८९ कोटी खर्च केल्यानंतर)


२०१८ मध्ये पर्जन्यमान ७४.३% असताना नोव्हेंबर महिन्यात ७१५ टँकर्स सुरु आहेत


 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करत आहेत त्या जलयुक्त शिवार योजनेनंतरही पाणी पुरवठ्यासाठीच्या टँकर्सची संख्या कशी काय वाढली? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने २०१५ ते २०१८ दरम्यान ७,७८९ कोटी खर्च केल्यानंतर देखील टँकर्सची संख्या वाढण्याचे कारण या योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार असल्याचे सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
3 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
3 :cry: Sad
7 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)