जलयुक्त अभियानामुळे जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीकडे

नगर – जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. या कामांना अधिक गती देण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य शासन नागरिकांसाठी करीत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर स्मार्ट ग्राम पुरस्कार, क्रीडा पुरस्कार आणि पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)