जलयुक्तशिवारमुळे पाणीसाठ्यात वाढ 

भूजल पातळी 0.35 मीटरनी वाढली 

कोल्हापूर (प्रतिनिधी): गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब-न-थेंब जलसंधारण प्रणालीव्दारे अडवून तो भूगर्भात मुरविल्याने जाखले गावात आज चांगला पाणीसाठा झाला असून भूजल पातळी 0.35 मीटरनी वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसहभाग आणि जलयुक्तशिवार अभियानातूनजाखले गावात गेल्या तीन वर्षात राबविलेल्या विविध जलसंधारण प्रणालीमुळे गावच्या विहीरींना पाझर सुटले असून गावातील ओढे आजही तुडूंब भरून वाहत आहेत. या पाण्यामुळे जाखलेच्या शिवारात हिरवीगार पीके डौलत आहेत.

2016-17 या वर्षात जाखले गावाची निवड जलयुक्त अभियानांतर्गत करण्यात आली आणि गावाचा लोकसहभाग तसेच शासन निर्णयातून जलसंधारणाची 54 प्रकारची कामे हाती घेण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानातून साडेचार कोटीची कामे तर लोकसहभागातून 54 लाखाची कामे करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांनी दिली. जाखले येथील जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करण्यासाठी आयोजित केलेल्या दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील, तहसिलदार गणेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी बंडा कुंभार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस.एस.गोधळी अन्य विभागांचे अधिकारी तसेच सरपंच सागर माने आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)