जलयुक्तच्या कामामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त – संभाजी पाटील- निलंगेकर

लातूर : लातूर जिल्ह्यात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झालेली होती. परंतू सन 2014-15 पासून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडविले गेले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण भूजल पातळीत मोठी वाढ झाली. परिणामी जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची उपलब्धता झाल्याने जिल्हा टँकरमुक्त झाला. भविष्यातही लातूर जिल्हा टँकरमुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.

निलंगा तालुक्यातील हंगरगा (शिर्शी) येथे रांजणगाव येथील फियाट ऑटोमोबाईल्स कंपनीने सामाजिक बांधिलकीतून निलंगा देवणी व शिरुर अनंतपाळ या तालुक्यातील 17 गावांसाठी 25 सिमेंट नाला बांधकाम, नाला खोलीकरण व रुंदीकरण यांचे काम करण्यात आले या कामाच्या  भूमीपूजनप्रसंगी निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, फियाट कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बावेजा यांची उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)