जलपर्णी काढल्याचे फोटो द्या बिले घ्या!

पिंपरी,-पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रातील मागील वर्षी जलपर्णी काढली आहे. त्या काढलेल्या जलपर्णीचे फोटो बिलासोबत सादर करा, अन्‌ तुमचे बिले घेवून जावा, अशी उपसूचना स्थायी समिती सभेत प्रशासनाने ठेवलेल्या अवलोकन विषयाला देवून मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठेकेदाराला जलपर्णी काढल्याचे फोटो पालिका प्रशासनास सादर केल्यानंतर सुमारे 40 लाख रुपये मिळणार आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे उपस्थित होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी (हायसिंथ) काढण्यासाठी पालिका प्रशासनाने तीन वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबविल्या होत्या. नद्याच्या पात्रातील जलपर्णी काढणे, कॅक्‍टस, प्लॅस्टीक व कचरा काढून नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी ई-निविदा नोटीस क्र.1/2017-18 अन्वये काढले होती. त्यानूसार पालिकेच्या ब, क आणि ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मुळा नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम वाकड पुल ते बोपखेल पर्यंतच्या कामासाठी प्राप्त झालेल्या निविदेपैकी मे. साई फ्राईट प्रा.लि. यांनी 4 लाख 48 हजार 200 रुपये एवढा दर दिलेला स्विकारला आहे. तसेच, अ, ब, क आणि ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पवना नदी पात्रातील सांगवडे-किवळे पुल ते दापोडी हद्दीत पवना नदीचे संपुर्ण जलपर्णी काढण्याची निविदा मे.साई फ्राईट प्रा.लि. यांनी पालिका अंदाजपत्रकीय रक्कम रुपये 24 लाख 93 लाख 100 रुपये सादर केला. याशिवाय फ आणि इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रातील आयटी पार्क निघोजे पुल ते डुडुळगाव स्मशानभूमी समोरील बंधाऱ्यापर्यंत जलपर्णी काढण्याच्या कामासाठी मे. साई फ्राईट प्रा. लि. यांनी पालिका अंदाजपत्रकीय रक्कम 9 लाख 96 हजार 500 रुपयांचा दराने काम दिले. त्यामुळे मुळा, पवना व इंद्रायणी हद्दीतील सर्वच क्षेत्रीय कार्यालयानी एकाच कंपनीला जलपर्णी काढण्याची कामे दिली.

 

बीलांची चौकशी करण्याची मागणी…
एका वर्षांच्या कालावधीत नदी पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी मे. साई फ्राईट प्रा.लि.कंपनी कामे दिलेली आहेत. तिन्ही नद्यावर सुमारे 40 लाख रुपये खर्च जलपर्णी काढण्यासाठी केला आहे. दरम्यान, स्थायी समितीने जलपर्त्रीची कामे झाली की नाही याची खात्री करुन बिले द्यावीत, बिलांना ठेकेदारांनी फोटो लावून ती सादर करावीत, अशी उपसूचना लावून ती बिलांना मान्यता दिली आहे. त्यामुळे ठेकेदारांला बिलासोबत जलपर्णी काढल्याचा फोटो जोडल्याशिवाय बिले देवू नयेत, असा ठराव स्थायी समितीच्या सदस्यांनी केला आहे. तसेच, जलपर्णी बिलांची चौकशी करावी, अशी मागणीही आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मारुती भापकर यांनी केली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)