जलपर्णीमुक्‍त अभियानात काढली पाच ट्रक जलपर्णी

पिंपरी – रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई पर्व दुसरे यातील सहावा आठवडा थेरगावातील केजुबाई घाट येथे पार पडला.

यामध्ये पाच ट्रक भरून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली. आजवर 1 हजार 475 ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली आहे.

-Ads-

जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, पागे, हर्षद तुळपुळे, ओंकार गानू, मराठवाड्यातील नद्यांना पुनर्जीवित करण्याचे काम करणारे आनंद असोलकर, सोमनाथ आबा मुसुगडे, प्रदीप वाल्हेकर, ऍड. हर्षद नढे, ऍड. महेश टेमगिरे, बरना बोस, शाम मलगी, अभिषेक वाल्हेकर, सिद्देश्वर चिले, युवराज वाल्हेकर, सचिन काळभोर, गणेश बोरा, सुभाष वाल्हेकर, मारूती उत्तेकर, जगन्नाथ फडतरे, एस. पी. वायर्स च्या 15 कामगारांची टीम अभियानात सहभागी झाली होती.

ओंकार गानू आणि हर्षद तुळपुळे यांनी पवना नदीमधील पाण्याचे नमुने घेतले. सोमनाथ हरपुडे यांनी सूत्रसंचलन केले. संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)