जलपर्णीमुक्‍तीसाठी 68 लाखांचा खर्च

इंद्रायणी स्वच्छता मोहीम : आठ महिन्यांसाठी उपक्रम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी वाढत चालली आहे. ती हटवनू नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी पालिका 68 लाख रूपये खर्च करणार आहे. नदी स्वच्छतेचे हे काम पावसाळा वगळून हिवाळा व उन्हाळा या 8 महिन्यांच्या कालावधीत केला जाणार आहे.

शहरात सांगावडे- किवळे पुल ते दापोडीतील संगमापर्यत पवना नदीचे पात्र 24 किलोमीटर इतके आहे.तर, इंद्रायणी नदी निघोजे पुल ते डुडुळगाव असे 16 किलोमीटर अंतर शहरातून जाते. मुळा नदीचे पात्र केवळ 4 किलोमीटर आहे. या तीनही नदी पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून दुर्गंधी सुटते. तसेच, परिसरातील नागरिकांना डासांचा त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या वाढत्या तक्रारी आहेत.
जलपर्णी होऊन नये यासाठी दक्षता घेण्याची आग्रही मागणी दरवर्षी केली जाते. मात्र, नदीपात्र जलपर्णीने व्यापून जात असल्याचे चित्र कायम आहे. जलपर्णी काढण्यासाठी पालिकेने निविदा 30 ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केली होती. ती निविदा 17 ऑक्‍टोबरला उघडण्यात आली.

-Ads-

पवना नदीसाठी 3 निविदा प्राप्त झाल्या. राजलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 36 लाख 86 हजार 782 रूपयांची 10.50 टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली आहे. तर, इंद्रायणी नदीसाठी 3 निविदा प्राप्त झाल्या. अथर्व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 31 लाख 22 हजार 111 रूपयांची 5 टक्के दराची निविदा पात्र ठरली आहे.
या दोन्ही नद्यांच्या सदर कामाचा एकूण खर्च 68 लाख आहे. नदी स्वच्छतेचे हे केवळ 8 महिने कालावधीचे आहे. मनुष्यबळाद्वारे, बोटीने आणि यांत्रिक पद्धतीने जलपर्णी हठविण्याचे काम करण्यात येणार आहे. या खर्चाला मान्यतेचा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि.4) होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

…तर ठेकेदाराच्या बिलात कपात
गेल्या वर्षी जलपर्णी काढण्याचा ढिसाळ कामावरून पालिका प्रशासन व ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. निव्वळ ठेकेदाराला पोसण्यासाठी सदर ठेका दिला जात असल्याची आरोप झाला होता. मुंबईच्या साई फ्राईट कंपनीकडे पवना व इंद्रायणी या दोन्ही नद्या स्वच्छतेचे काम होते. समाधानकारक काम न केल्याने त्याचा एकूण बिलात कपात करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)