जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाचे 141 दिवस पूर्ण

पिंपरी – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानाचा  141 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला.

यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अभय गाडगीळ, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, पिंपरी चिंचवड जैन महासंघतील वेगवेगळ्या पंथातील सर्व जैन साधक व अध्यक्ष विरेंद्र जैन, कार्याध्यक्ष सुरेश गादिया, महामंत्री ऊमेश पाटील, कोषाध्यक्ष नेनसुख मंडोत, माजी अध्यक्ष आजित पाटील, नितीन बेदमुथा, विलास पगारिया, सुदिन खोत, मोहनलाल संचेती, प्रकाश कटारिया आणि मनोज बाफना, मँथर प्लँन्ट व संयोजक सुर्यकांत मुथीयान, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एनएसएस प्रोग्राम ऑफिसर जयदीप खाडे, एनएसएस युनिटमधील चाळीस पेक्षा अधिक विद्यार्थी, सिटी प्राईड कॉलेजचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, ज्युनिअर सायंटिस्ट दिशा शिरसकर, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच रानजाई प्रकल्पाचे 50 मजूर देखील उपस्थित होते.

गेल्या 141 दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई ही संकल्पना रोटरीचे अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी विस्तृतपणे सर्व नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. तसेच भविष्यात केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामांची, योजनांची माहिती दिली.

महावीर जयंती निमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पवना नदीतील जलपर्णी बाहेर काढण्यात आली. अनेक दानशुरांनी रोख व धनादेशाच्या स्वरूपात या अभियानास मदत केली. यामध्ये सूर्यकांत मुथियान यांनी पाच हजार रुपये, संतोष कर्णावत यांनी अकरा हजार रुपये, अभय खिंवसरा यांनी पाच हजार रुपये आणि मोहनलाल संचेती यांनी पाच हजार रुपये मदतनिधी म्हणून दिला. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या क्लबला रोटरी 3131 चे प्रांतापाल अभय गाडगीळ यांनी ऑफिशिअली भेट दिली. क्लबच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले व सध्या सुरु असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मदतनिधी म्हणून एक लाख रुपयांचा निधी मजूर केला.

आपण दररोज ज्या नदीचे पाणी पितो, त्या नदीची स्वच्छता करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने पार पडायला हवी. आम्ही प्रथमच महावीर जयंती नदी स्वच्छतेने करीत आहोत. समाजोपयोगी कार्यातून जयंती साजरी होत असल्याने जयंतीचा आनंद द्विगुणित होत आहे. अशा प्रकारच्या भावना यावेळी उपस्थित जैन बांधवांनी व्यक्त केल्या. आम्ही या उपक्रमाला शक्य तितकी मदत करू, असे आश्वासन देखील जैन बांधवांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)