जलद न्यायासाठी कायद्यात बदल आवश्‍यक

खा. सुळे यांचे मत; संसदेच्या अधिवेशनात प्रश्‍न मांडणार

नगर – कोपर्डीची घटना घडून वर्ष होवून गेले; मात्र अजून आरोपींना फाशी होऊ शकली नाही. यासाठी कायद्यामध्ये बदल होणे आवश्‍यक आहे. न्यायालयामधील कामकाज जलद गतीने व्हावे, सामान्यांच्या केसेस लवकर निपटाव्यात यासाठी कायद्यांमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्‍यक आहे. यासाठी आवश्‍यक माहिती व कागदपत्रे नगरच्या वकिलांनी माझ्याकडे द्यावीत. संसदेच्या अधिवेशनामध्ये याबाबत आपण प्रश्‍न मांडू असे आश्‍वासन खा. सुप्रिया सुळे यांनी दिले.
खा. सुळे या नगर दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी जिल्हा न्यायालयास सदिच्छा भेट दिली. शहर वकील संघटनेच्या माध्यमातून सर्व वकिलांशी संवाद साधला. या वेळी वकील संघटनेचे अध्यक्ष शेखर दरंदले यांनी खा. सुळे यांचे स्वागत करुन सत्कार केला. या वेळी आ. संग्राम जगताप, वकील संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. गजेंद्र पिसाळ, सचिव ऍड. प्रसाद गांगर्डे, खजिनदार ऍड. राजेश कावरे, सहसचिव ऍड. सुनील आठरे, महिला सचिव ऍड. गीतांजली पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
कुठलीही निवडणूक झाली, की आमच्या पवार कुटुंबीयांवर केस होणार हे निश्‍चित. त्यामुळे वकिलांचे व आमच्या कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, अशी मिश्‍कील टिप्पणी करून त्या म्हणाल्या, की माझ्या वैयक्तिक जीवनात वकिलांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनानेच आपण काम करीत आहेत. त्यामुळेच यशस्वी झाले आहे. न्यायालय व वकील हे समाजातील महत्वाचे घटक आहे. त्यामुळे वकिलांचे कामकाज व्यवस्थित होणे आवश्‍यक आहे. नगर जिल्हा न्यायालयाची इमारत जरी नवीन असली तरी बरेच प्रश्‍न प्रलंबित आहेत. वकिलांची मोठी संख्या असल्याने चांगल्या सोयी सुविधा मिळत नाहीत, याकडेही लक्ष देऊन ते सोडविण्यासाठी पाठपुरवठा करू.
या ऍड. दरंदले यांनी न्यायालयाच्या विविध समस्यांचा पाढा खा. सुळे यांच्यापुढे वाचला. ते म्हणाले, की जिल्हा न्यायालयामध्ये येणाऱ्या तुम्ही पहिल्या खासदार आहात. या भागातील खासदार कधीच जिल्हा न्यायालयात आले नाहीत. न्यायालयाच्या नूतन इमारतीबाबत बरेच प्रश्‍न प्रलंबित असून, वकिलांच्याही चेंबर, पार्किंग, बार रुमबाबतच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरवठा करत आहोत; मात्र अद्याप त्या सुटल्या नाहीत. या सोडविण्यासाठी खासदार म्हणून तुम्ही लक्ष घालावे.
माजी अध्यक्ष ऍड.सुरेश ठोकळ यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ऍड. गजेंद्र पिसाळ यांनी तर आभार मानले. वकील संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य ऍड. अनुजा मोहिते, ऍड. प्रणवकुमार आपटे, ऍड. कश्‍यप तरकसे, ऍड. सुधाकर पवार, ऍड. सुभाष वाघ, ऍड. महेश शिंदे, ऍड.बबन सरोदे, ऍड. मंगेश सोले, लॉयर्स सोसायटीचे सचिव ऍड. रफीक बेग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)