जलतरण तलावांबाबतचे धोरण ठरवून पक्षनेत्यांपुढे ठेवावेत

पुणे- महापालिका जलतरण तलावांबाबतचे धोरण तयार करून ते पक्षनेत्यांपुढे ठेवावेत, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मुख्यसभेत प्रशासनाला दिले. प्रफुल्ल वानखेडे या तरुणाचा तळजाई टेकडीवरील महापालिकेच्या जलतरण तलावात झालेल्या मृत्युबाबत मुख्यसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर महापौरांनी वरील आदेश दिले आहेत.

वानखेडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याविषयीचा प्रश्‍न धीरज घाटे यांनी मुख्यसभेत उपस्थित केला. अशी मदत देण्यासंदर्भात महापालिकेकडे कोणतेच धोरण नाही; नैसर्गिक आपत्ती या धोरणाखालीही ते देता येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी सभेत सांगितले. त्यावर महापौरांनी प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

उन्हाळ्यात जलतरण तलावांवर गर्दी असते. ठेकेदारांशिवाय अधिकाऱ्यांकडून जलतरणतलावांची वरचेवर तपासणी केली जात नाही. वास्तविक वर्षातून दोन वेळा तरी ती पाहणी झाली पाहिजे. जलतरण तलावात जीवरक्षक उपलब्ध आहेत का, तसेच जीवरक्षक साधने पुरेशी आहेत का, याची तपासणीही होणे आवश्‍यक आहे. मात्र ती होताना दिसत नाहीत, अशा शब्दांत महापौरांनी नाराजी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)