जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांचा सन्मान

जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांचा सन्मान पद्मश्री पुरस्काराचे निमित्त : महात्मा फुले एज्युकेशन फाउंडेशनचा पुढाकार पिंपरी, दि.21 (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पॅंरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (पद्मश्री पुरस्कार विजेते) यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने मुरलीकांत पेटकर यांना सन्मानित केले आहे. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशी जाधव, राकेश भास्कर, संजय कुटे उपस्थित होते. मुरलीकांत पेटकर यांनी अपंगत्वावर मात करुन क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय लष्कारात देशसेवा कारताना 1965 च्या भारत-पाकिस्तान लढाईत त्यांना अपंगत्व आले. अजूनही एक गोळी पाठीत आहे. तरीही त्यांनी न डगमगता अनेक खेळांमध्ये बॉक्‍सिंग, टेबल टेनिस, स्विमिंगमध्ये पदक मिळवले आहेत. पॅंरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय जलतरणपटू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या "शिव छत्रपती' पुरस्कारानेही पेटकर यांना गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टेलको कंपनीत Public Relation Department मध्ये सिनिअर पोस्टवर पेटकर यांनी काम केले आहे. भारतीय लष्काराच्या माध्यमातून देशसेवा करतांना आलेल्या अपंगत्वावर आपण मिळविलेल्या विजयाचे पॅंरालिंपिकमध्ये स्पर्धेतील सुवर्णपदक हे जणू प्रतिक आहे. त्यासोबतच ते इतरांसाठी आर्दशवत आहे. पद्मश्री पुरस्काराने आपल्या कामगिरीचा होत असलेला गौरव महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, असे मत यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्‍त केले. ------ फोटो ओळी पिंपरी : भारतीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण चाबुकस्वार व उपस्थित मान्यवर.
  • पद्मश्री पुरस्काराचे निमित्त : महात्मा फुले एज्युकेशन फाउंडेशनचा पुढाकार

पिंपरी, (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पॅंरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (पद्मश्री पुरस्कार विजेते) यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने मुरलीकांत पेटकर यांना सन्मानित केले आहे. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशी जाधव, राकेश भास्कर, संजय कुटे उपस्थित होते. मुरलीकांत पेटकर यांनी अपंगत्वावर मात करुन क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय लष्कारात देशसेवा कारताना 1965 च्या भारत-पाकिस्तान लढाईत त्यांना अपंगत्व आले. अजूनही एक गोळी पाठीत आहे. तरीही त्यांनी न डगमगता अनेक खेळांमध्ये बॉक्‍सिंग, टेबल टेनिस, स्विमिंगमध्ये पदक मिळवले आहेत. पॅंरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय जलतरणपटू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “शिव छत्रपती’ पुरस्कारानेही पेटकर यांना गौरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, टेलको कंपनीत Public Relation Department मध्ये सिनिअर पोस्टवर पेटकर यांनी काम केले आहे.

भारतीय लष्काराच्या माध्यमातून देशसेवा करतांना आलेल्या अपंगत्वावर आपण मिळविलेल्या विजयाचे पॅंरालिंपिकमध्ये स्पर्धेतील सुवर्णपदक हे जणू प्रतिक आहे. त्यासोबतच ते इतरांसाठी आर्दशवत आहे. पद्मश्री पुरस्काराने आपल्या कामगिरीचा होत असलेला गौरव महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, असे मत यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्‍त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)