जर्मन महिलेची गोभक्‍ती

आपल्या देशात रस्त्यांवर ट्रॅफिक अडवत निवांत बसलेल्या गायींचे दृश्‍य कुठल्याही शहरात पाहायला मिळू शकते. अर्थात यामध्ये या गायींचा नव्हे तर त्यांना असे सोडून देणाऱ्यांचाच दोष असतो. कुणी नवस म्हणून, कुणी दान म्हणून तर कुणी गायीने दूध देणे बंद केल्यावर अशा गायी सोडलेल्या असतात. “सर्वांभूती परमेश्वर’ पाहणाऱ्या गायीला पूज्य मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत या गायी कशा जगत असतील याची कधी कुणाला फिकीर वाटत नाही.

अशा स्थितीत परदेशातून आलेली एक महिला अशा भटक्‍या गायींसाठी मोलाचे कार्य करीत आहे. ही महिला अशा तब्बल 1200 गायींची पदरमोड करून देखभाल करीत आहे! या महिलेचे नाव आहे फ्रियेडरिक इरिना ब्रुनिंग. 59 वर्षांची ही महिला अध्यात्माच्या ओढीने भारतात, मथुरेत आली होती. त्यावेळी तिचे लक्ष रस्त्यात फिरत असलेल्या, बसलेल्या या गायींकडे गेले. कुठेही गेले तरी या गायींचे दृश्‍य आणि त्याबाबतचा विचार तिचा पिच्छा पुरवत राहिला. अनेक लोक भाकड जनावर म्हणून अशी गुरे सोडून आपली जबाबदारी झटकत असतात, असे कुणी तरी तिला सांगितले. त्यामुळे तिने भारतातच राहून अशा निराधार गायींची देखभाल करण्याचे ठरवले.

त्यासाठी तिने “सुरभी गोसेवा निकेतन’ या संस्थेची स्थापना केली. आता या संस्थेत सुमारे 1200 भटक्‍या गायींची देखभाल केली जाते. इथे त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते आजारी असलेल्या गायींच्या औषधोपचारापर्यंतची सर्व सेवा केली जाते. या निकेतनमध्ये साठ लोक काम करतात. त्यांचे वेतन व अन्य गोष्टींसाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च येतो. ब्रुनिंगचे वडील त्यासाठीचे पैसे जर्मनीतून पाठवत असतात. मात्र, ते आता निवृत्त झाल्याने ब्रुनिंग आपली मालमत्ता विकून गायींची सेवा करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)