जर्मनीत ‘बोलक्‍या बाहुल्या नष्ट करण्याची पालकांना सूचना

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीतील पालकांनी त्यांच्या मुलांकडे असलेल्या बोलक्‍या बाहुल्या-“कायला’ नष्ट कराव्या, अशी सूचना जर्मनीतील अधिकृत दक्षता समिती (वॉचडॉग) ने केली आहे. या बोलक्‍या बाहुल्यांमध्ये असलेल्या स्मार्ट टेक्‍नॉलॉजीमुळे खासगी माहिती उघड होऊ शकते, आणि हॅकर्स मुलांबरोबर प्रत्यक्ष संपर्क साधू शकतात, असे सांगितले आहे.
दूरसंचारवर देखरेख करणाऱ्या एफएनए (फ़ेडरल नेटवर्क एजन्सी)ने ही धोक्‍याची सूचना दिलेली आहे. कायली या बाहुलीमध्ये असणारे ब्लू टूथ उपकरण असुरक्षित असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. ब्लू टूथमुळे कायला ही बाहुली तिच्याशी खेळणाऱ्या मुलांशी संवाद साधू शकते. मुलांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकते. त्यासाठी ती इंटरनेटचा वापर करते. उदाहरणार्थ गायीच्या पिल्लाला काय म्हणतात, असा प्रश्‍न मुलाने विचारला, तर कायली ” गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात असे उत्तर देते.
मात्र बाहुली “कायली’ च्या निर्मात्यांनी-द विविड टॉय ग्रुपने जर्मन दक्षता समितीच्या या धोक्‍याच्या सूचनेवर काही टिप्पणी केलेली नाही. सन 2015 मध्ये सर्वप्रथम कायलीमुळे होणाऱ्या या संभाव्य धोक्‍याबाबत सूचना देण्यात आली होती. अमेरिका आणि युरोपियन समुदायानेही कायलाबाबत तक्रार नोंदवली आहे.
कायलाच्या साह्याने खासगी माहिती हॅक करण्याबरोबरच, हॅकर्स मुलांबबरोबर संपर्क साधू शकतात. जर्मनीतील कायद्यानुसार टेहळणी, करू शकणारे/पाळत ठेवू शकणार उपकरण विकणे वा त्याचा वापर करणे हा गुन्हा असून त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो असे जर्मन माध्यमांनी म्हटले आहे.
सारलॅंड विद्यापीठातील एक विद्यार्थी स्टीफन हेसल याने कायली बाबत कायदेशीत हरकत घेतल्यानंतर एफएनएने धोक्‍याची सूचना जारी केली आहे. कायलीपासून 33 फूट (10 मीटर्स) अंतरावरून, अनेक भिंतींमधूनही तिच्याशी खेळणारावर पाळत ठेवता येते असे स्टीफन हेसलने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)