नव नाझी चळवळीतील कार्यकर्त्यांवर संशय
बर्लिन – जर्मनतील एका ज्यु धर्मियाच्या रेस्टॉरंटवर काही बुरखाधारी अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना येथे घडली. पुर्व जर्मनीत निओ नाजी चळवळ जोर धरू लागली असून त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात निर्वासितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

तेथे राजकीय आश्रय मागणाऱ्या निर्वासितांकडूनच एका जर्मन नागरीकाची हत्या झाल्यानंतर या भागात हिंसक घटना वाढल्या आहेत. निर्वासितांच्या विरोधात राजकीय द्वेष भावनेतून हा हिंसाचार होत असल्याची माहिती स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली. ज्यु रेस्टॉरंटवर हल्ला करण्याचा हा प्रकार पुर्व जर्मनीतील चेम्नीट्‌झ शहरात घडला आहे.

सुमारे डझनभर लोकांनी हा हल्ला केला. त्यांनी हॉटेलवर दगड फेकले आणि तेथे त्यांनी मोडतोडही केली. या हल्ल्यात हॉटेल चालक युवे डिझुबल्ला हे जखमी झाले आहेत. तथापी त्यांची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर आहे. सन 2000 साली उघडण्यात आलेल्या या रेस्टॉरंटवर यापुर्वीही अनेक हल्ले झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)