#जरा हटके: हॅकिंगमुळे बचत खाते रिकामे 

विनायक सरदेसाई 
सध्याचा जमाना हा ऑनलाइनचा आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स, ऍप्स, सोशल मीडिया यांचा वापर न करणारी व्यक्‍ती शोधणे अवघड आहे. आजच्या डिजिटल जगामध्ये असे कऱणेही आवश्‍यक आहे. कारण ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌वीटर इत्यादी माध्यमे संदेश आणि सूचनांच्या आदान- प्रदानासाठी गरजेची आहेत. ऑनलाईन बॅंकिंग, फोन बॅंकिंग सारख्या ऍप्सचा वापर आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी गरजेचे आहे. या सुविधा असल्या तरी काही वेळा मात्र त्या नुकसानही करु शकतात. डाटा चोरी होऊ शकत असल्याने आपल्या मेहनतीच्या साऱ्या कमाईवर डिजीटल चोरांकडून एका क्‍लिकमध्ये डल्ला मारला जाण्याची शक्‍यताही वाढली आहे. त्यामुळे या सर्वांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. 
इंटरनेटमुळे बॅंकिंग व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. पण त्याचबरोबर काही धोकेही आहेतच. आपले खाते हॅक करून पैसे परस्पर कोणी काढून घेऊ नये यासाठी आपण कायमच सजग राहिले पाहिजे. सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स, ऍप्स, सोशल मीडिया यांचा वापर न करणारी व्यक्‍ती शोधणे अवघड आहे. आजच्या डिजिटल जगामध्ये असे कऱणेही आवश्‍यक आहे. कारण ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌वीटर इत्यादी माध्यमे संदेश आणि सूचनांच्या अदान प्रदानासाठी गरजेची आहेत. ऑनलाइन बॅंकिंग, फोन बॅंकिंगसारख्या ऍप्सचा वापर आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी गरजेचा आहे. तर मनोरंजन, आरोग्य यासंबंधी आणि मार्केटची ताजी माहिती मिळवण्यासाठी देखील अनेक ऍप्सचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. या सुविधा असल्या तरी काही वेळा मात्र त्या नुकसानही करु शकतात.
डाटा चोरी होऊ शकत असल्याने आपल्या मेहनतीच्या साऱ्या कमाईवर डिजीटल चोरांकडून एका क्‍लिकमध्ये डल्ला मारला जाण्याची शक्‍यताही वाढली आहे. त्यामुळे या सर्वांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे.
वायफाय नेटवर्क सुरक्षित नसेल तर त्याला पासवर्ड नसेल तर इतर लोक मोफत डेटाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर एखादा तांत्रिक तज्ज्ञ व्यक्‍ती चोरीच्या उद्देशाने या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरुन आपल्या खात्यातून पैसे काढू शकते. किंवा एखादा गुन्हेगार किंवा दहशतवादी आपल्या नेटवर्क मार्फत आपल्या बेकायदेशीर किंवा समाजविघातक कृत्यांना पार पाडेल. वायफाय नेटवर्कच्या सुरक्षिततेसाठी गरज नसेल तेव्हा बंद करुन ठेवावे. उत्पादकांकडून दिलेले नाव बदलावे आणि गुंतागुंतीच्या पासवर्डने त्याची सुरक्षा करावी. तसेच पासवर्ड नेहमी बदलत रहावा. तसेच तो इनव्हिजीबल ठेवला तर शोधण्याचा प्रयत्न केला तरीही तो दिसू शकणार नाही.
फ्री वाय फायपासून बचाव 
मोफत गोष्टी कोणाला नको आहेत. हल्ली रेल्वे स्टेशन, मॉल्स अगदी काही रस्ते बागा, विशिष्ट परिसरात मोफत वायफाय नेटवर्क मिळत असल्याचे दिसते. फुकट ते पौष्टिक म्हणत त्याचा वापर करायला सर्वच जण उत्सुक असतात त्यात नवल नाही, पण अशा मोफत वायफायपासून दूर राहणेच योग्य. कारण डिजिटल तज्ज्ञ संपूर्ण वायफाय झोनच्या ट्रॅफिकला हॅक करू शकतात. डाटा प्रोटेक्‍शन तज्ज्ञांच्या मते मोफत वायफाय वरून जेव्हा एखादा चित्रपट किंवा गाणे डाउनलोड करत असता तेव्हा एखादा गुन्हेगार आपल्या स्मार्टफोनचे नेटवर्क हॅक करून आपल्याच खात्यातून सर्वच पैसे चोरू शकतो किंवा एखादे गुन्हेगारी कृत्य करू शकतो. त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते. त्यामुळे शक्‍यतो मोफतच्या प्रेमात पडू नका.
ऍप्सची निवड 
स्मार्टफोन्समध्ये मेमरी जास्त असल्यामुळे आपण मोफत ऍप्स डाऊनलोड करतो. गरज नसतानाही विचार न करता ऍप्स डाऊनलोड करतो. मात्र या ऍपवरून आपल्या माहितीची चोरी होऊ शकते किंवा तिचा गैरवापर होऊ शकतो. एवढेच नाही तर आपल्या फोनमधील इतर संपर्क क्रमांकाचीही माहिती चोरली जाऊ शकते. जेव्हा गुगल मॅप्सचा वापर करत असू तेव्हाच फक्त लोकेशन ट्रॅकिंगची परवानगी द्यावी. जेव्हा वापर थांबवू तेव्हा ट्रॅकिंगही थांबवावे.
ई-मेल चा वापर 
ई-मेल पासवर्ड हा क्‍लिष्ट किंवा मजबूत ठेवा. सहजपणे अंदाज लावता येणार नाही असा पासवर्ड असावा. ई-मेलसाठी टू स्टेप ऑथेंटिकेशनचा वापर करावा. त्यामुळे कोणत्याही नव्या मशीनवर दुसऱ्या व्यक्तीने आपले ई-मेल वापरायचा प्रयत्न केल्यास मोबाईलवर ओटीपीची विचारणा होईल. यामुळे हॅकिंगची जोखीम कमी होते. हॅकर्स अनेकदा अटॅचमेल असलेले ई-मेल पाठवतात ज्यामध्ये व्हायरस किंवा मालवेअर असतात. असे मेल चुकुनही उघडून पाहू नये.
सोशल मीडियावर अलर्ट 
काही लोक आपली जन्मतारीख, घराचा पत्ता, फोन नंबरही समाज माध्यमांवर खुलेपणाने टाकतात. मात्र या सर्व गोष्टी इंटरनेटवर कायमस्वरूपी नोंदवल्या जातात. अगदी खाते काढून टाकले तरीही ही माहिती कायम राहते. त्यामुळे हॅकर्स कधीही त्यावर डल्ला मारू शकतात. त्यामुळेच सोशल मीडियावर वैयक्‍तिक माहिती शेअर करणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. बॅंकांमध्ये पासवर्ड ठेवण्यासाठी किंवा थर्ड पार्टी ट्रान्सफर करताना काही प्रश्‍न विचारते या प्रश्‍नाची उत्तरे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)