जरंडेश्‍वरच्या डिस्टिलरीचा ताबा लक्ष्मी ऑरगॅनिक कडेच

उच्च न्यायालयाचे कराड जनता बॅंकेला आदेश

कोरेगाव- जरंडेश्वर कारखान्याच्या वर्धनी डिस्टिलरीला कराडच्या जनता सहकारी बॅंकेने लावलेले सील काढून डिस्टिलरीचा ताबा लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजकडे देण्याचे आदेश शनिवारी उच्च न्यायालयाने दिले. 158 ऊस वाहतूकदारांच्या कर्जापोटी बॅंकेने हे सील लावले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा डिस्टलरी प्रकल्प लक्ष्मी ऑरगॅनिक इंडसट्रीजला कंपनीला बुट पद्धतीने देण्यात आला होता. त्याचा करार संपल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. 23 पर्यंत करार वाढवून दिला होता. 2003 मध्ये कारखाना सुरू असताना गळीत सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने वाहतूकदारांच्या नावे 4 कोटींचे कर्ज जनता सहकारी बॅंकेमधून घेतले होते. या कर्जाची आज व्याजासहित रक्कम 21 कोटी झाली आहे. त्या कर्जापोटी बॅंकेने जरंडेश्वर कारखान्याच्या मालकीच्या वर्धनी डिस्टलरीचा ताबा घेवून बॅंकेच्या वसुलीअधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी दुपारी बळाचा वापर केला.

डिस्टिलरी विभागाच्या ऑफीस व वर्कशॉपला सील लावले व डिस्टलरीचा कब्जा घेण्याचा बॅंकेमार्फत प्रक्रिया सुरू होती. याच दरम्याने लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीचे, मनुष्य बळ विकास विभागाचे व्यवस्थापक एस. आर. पाटील यांनी सातारा येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेवून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन आठवड्याची मुदत देत बॅंकेच्या कारवाईस स्थगिती दिली होती. शुक्रवारी लक्ष्मी ऑरगॅनिकने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. आर. डी. धनुका यांच्यासमोर सुनावणी झाली.

कंपनीतर्फे जुलीस कॉर्पच्या वकीलाने तर बॅंकेच्या वतीने ऍड. दिलीप शिंदे यांनी काम पाहिले. यानंतर न्या. धनुका यांनी दि. 8 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत डिस्टलरीला लावलेले सील काढून त्याचा ताबा लक्ष्मी ऑरग्यानीक कंपनीकडे देण्याचे आदेश कराड जनता सहकारी बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांना दिला. त्याप्रमाणे बॅंकेचे वसुली अधिकारी पवार यांनी सहकाऱ्यांसह डिस्टलरी साईटवर येवून कार्यालय व वर्कशॉपला लावलेले सील तोडले आणि लक्ष्मी ऑरग्यानीकचे व्यवस्थापक सुधीर वाडकर, पी. जी. पाटील यांना ताबा दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)