पिंपरी : श्रीनगर परिसरात व्हॉल्व्ह फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे.

पिंपरी- श्रीनगर परिसरातील जय भवानी चौकातील पाण्याचा व्हॉल्व्ह फुटल्याने रस्त्यातून पाण्याचे पाट वाहत असून त्यामुळे घसरून अपघात होण्याची शक्‍यता आहे. यामुळे व्हॉल्व्हची दुरुस्ती करून पाण्याची होणारी नासाडी थांबवण्यासाठी, तसेच अपघात टाळण्यासाठी राहटणी-काळेवाडी येथील शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. ग-प्रभाग थेरगाव कार्यक्षेत्रात प्रभाग क्रमांक 27 राहटणी-काळेवाडी येथील जय भवानी चौकातील पाण्याचा व्हॉल्व्ह अनेक दिवसांपासुन नादुरूस्त आहे. यातून प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि रस्त्यावर मात्र पाण्याचे पाट वाहात आहेत. त्यामुळे महापालिकेने याची दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाला तात्काळ व्हॉल्व्ह दुरूस्तीचे आदेश देण्याची मागणी दाखले यांनी निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)