जय बोलो भगवान महावीर की…

पिंपरी – शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांची 2617 वी जयंती पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जैनम्‌ जयती शासनम्‌, जैन धर्म की शान है अशा भक्तीगीतांनी भारावलेल्या वातावरणात सजविलेली बग्गी व चंदेरी रथातून महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून शहरात अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुका काढत अहिंसेचा संदेश देण्यात आला.

भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील कत्तलखाने आज बंद ठेवण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने महावीर स्वामींना अभिवादन करण्यात आले. जैन समाज बांधवांच्या वतीने शहरात शिस्तबध्दपध्दतीने भगवान स्वामींची मिरवणूक काढण्यात आली. त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की अशा जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता. पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले पुरुष आणि लाल साड्या घातलेल्या महिला या मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. समाज बांधवांनी एकमेकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत एकतेचे दर्शन घडविले.

विद्यादान उपक्रम
भगवान महावीर जन्मक कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने मोहननगर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील प्रांगणात विद्यादान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे यंदाचे अकरावे वर्ष होते. सरस्वती पूजन व नवकार महामंत्राने कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपप्रवर्तीनी रिध्दीमाजी व संबोधिजी महाराज साब, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश राका, सुरेश गादिया, आनंद पगारिया, निर्मला खिंवसरा, कांतबाई दरडा, लिलावती मेहेर, अनिल लुंकड, हर्षद लुंकड, गणेश दातीर पाटील, लता कांकरिया, माधुरी भंडारी, छगनलाल मुथा, राहुल बोरा आदी उपस्थित होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच निसर्ग शिक्षण संस्थेला धान्य भेट देण्यात आले. प्रास्ताविक अजय दरडा यांनी केले. स्वागत अनिल लुंकड यांनी केले. सूत्रसंचलन सतीश मेहेर यांनी केले तर उज्ज्वला लुंकड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)