१९७९ मध्ये सरगम चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या सुंदर दिग्गज बॉलिवुड अभिनेत्री जयाप्रदा यांनी बॉलिवुड क्षेत्रात आपले मोठे नाव निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या मोहक व आकर्षक स्टाइलसह नेहमीच चाहत्यांना आकर्षून घेतले आहे. बहुविध भूमिकांमधील अभिनयासोबतच ‘आज का अर्जुन’मधील ‘गोरी है कलाइयां’ या गाण्यावरील त्यांचे सुंदर नृत्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
मालिका ‘परफेक्ट पति’मध्ये पुन्हा एकदा त्याच नृत्याला उजाळा देत दिग्गज अभिनेत्री जयाप्रदा जवळपास २८ वर्षांनंतर लता मंगेशकर व शब्बीर कुमार यांनी गायलेल्या या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. मालिकेमधील त्यांचा मुलगा पुष्कर (आयुष आनंद) आणि भावी सून विधिता(सायली संजीव) यांच्या विवाह सोहळ्यामधील सेलिब्रिटी नृत्यासाठी त्यांनी परिधान केलेला विवाह सोहळ्यास अनुरूप असा पोशाख आणि त्याला साजेशा अशा आभूषणांमुळे या अभिनेत्रीने सेटवरील सर्व कलाकार व टीमचे लक्ष वेधून घेतले.
५६ वर्षाच्या या देखण्या अभिनेत्रीला आपले मोहक नखरे आणि उत्साहपूर्ण ऊर्जेसह प्रेक्षकांना कशाप्रकारे अचंबित करावे हे निश्चितच माहीत आहे. पडद्यावरील या सोहळ्याचा आनंद घेणा-या अभिनेत्रीने आपल्या नृत्याच्या माध्यमातून दिग्गज व सदाबहार लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे नृत्य असलेला हा एपिसोड या महान गायिकेच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित करण्यात येईल.
अनेक वर्षांनंतर या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केल्याबाबत त्या म्हणाल्या, ”मी या गाण्यांचे चित्रीकरण झाल्यापासून अनेकवेळा या गाण्यावर परफॉर्मन्सेस सादर केले आहेत. पण तीच ऊर्जा, उत्साह व भावनांसह नृत्य सादर करण्याला बराच काळ उलटून गेला आहे. या गाण्याने अनेक जुन्या आनंददायी आठवणींना उजाळा दिला. मी माझ्या आवडीच्या गाण्यांपैकी एक असलेल्या या गाण्यावर नृत्य करताना खूप मजा केली होती. माझ्या मते ‘परफेक्ट पति’ मालिकेमधील विधिता व पुष्कर यांच्या भव्य विवाह सोहळ्यासाठी हे साजेसे असे गाणे आहे. मला आनंद होत आहे की माझे नृत्य सादरीकरण लताजींच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेक्षकांसेमार सादर केले जाईल. मी आशा करते की हे सादरीकरण या हिट गाण्याशी जोडलेल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देईल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून त्यांना आरोग्यदायी, आनंदी व प्रेमयुक्त शुभेच्छा.”
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा