जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केले पिंपरी रेल्वे स्थानक

पिंपरी-  येथील जयहिंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पिंपरी रेल्वे स्थानकावर स्वच्छता केली. जयहिंद हायस्कूल मध्ये 1 ते 6 ऑक्‍टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मंगळवारी (दि.1) पिंपरी रेल्वे स्थानकावर 60 विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्थानकाची स्वच्छता केली. यात हायस्कूलच्या 30 स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी व इतर 30 अशा 60 विद्यार्थ्यांनी ही मोहीम राबवली. हे विद्यार्थी इयत्ता आठवी व नववीचे असून त्यांच्यासोबत चार शिक्षकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या उपक्रमास पिंपरी रेल्वे स्टेशन मास्टर नरेंद्र ढवळे यांनी मदत केली व स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. अशी माहिती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)