जयहिंद वाचनालयामुळे मुलांना वाचनाची आवड

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

कोळकी – मुलांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांची मनोवृत्ती विधायक, सकारात्मक व्हावी या उद्देशाने 1995-96 साली जयहिंद वाचनालय व ग्रंथालयाची स्थापना कोळकी गावात सुरू करण्यात आले. याबाबत माहिती देताना अध्यक्ष पोपटराव जगदाळे म्हणाले, ग्रंथालयात एकूण 10 हजार 922 पुस्तके असून यामध्ये ऐतिहासिक, प्रासंगिक, विनोदी, आरोग्य, बालसाहित्य याबरोबरच अनेक विचारवंतांची व महिलांच्या उपयोगी पुस्तकांचा समावेश आहे. तसेच वृत्तपत्रे, मासिक यांचाही समावेश आहे. 251 सभासद असणाऱ्या या ग्रंथालयास ब वर्ग प्राप्त असून शासनाचे अनुदानही मिळते. सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हे वाचनालय उघडे असते. अनेक ग्रामस्थ या वाचनालायचा लाभ घेत असतात. भविष्यात हे ग्रंथालय आधुनिक, सर्वसुखसोयींनी अद्ययावत करून सभासद संख्या वाढवून, वाचन संस्कृती समृद्ध करण्याचा आपला मानस असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुसेसावळीचे कै. लक्ष्मीबाई कुलकर्णी ग्रंथालय

येथे सन 1991 पासुन “कै. लक्ष्मीबाई कुलकर्णी वाचनालय व ग्रंथालय” या नावाने ग्रामपंचायत पुसेसावळी यांच्यावतीने ग्रंथालय व वाचनालय चालवण्यात येत आहे. ग्रंथालयात सर्व नामवंत लेखकांची वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, बाबा कदम, आचार्य अत्रे, भालचंद्र नेमाडे, वि. वा. शिरवाडकर अशा प्रतिभावंत साहित्यिक व लेखकांची ग्रंथसंपदा पहायला मिळते. सर्वसाधारण अकराशे विविध विषयावरील पुस्तके या ठिकाणी आहेत. ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धतता,माहितीतील वाढ, ग्रंथालयांच्या आर्थिक समस्या इत्यादी सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांच्या माध्यमातुन करावे लागते अशी माहिती श्रीमती ग्रंथपाल कांताबाई कदम यांनी दिली.

ओझर्डेचे पतित पावन ग्रंथालय
ओझर्डे, ता. वाई येथील पतित पावन विद्यामंदिर येथे ग्रंथालय आहे. शाळेची स्थापना झाल्यापासून येथे ग्रंथालय उपलब्ध आहे. अवांतर माहिती देणारी पुस्तके व विविध खंड, ग्रंथ उपलब्ध आहेत.ग्रंथालयाची परिस्थिती एकदम उत्तम आहे. वाई तालुक्‍यात ओझर्डे हे गाव वाचनाची परंपरा असलेले गाव म्हणून ओळखले जाते. मुलांना चांगले शिक्षण द्यावे हाच ध्यास इथल्या पालकांनी घेतलेला असतो. त्यामुळेच येथील सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा वाचनाची प्रचंड आवड आहे. ओझर्डे येथील ग्रंथालयाची स्थापना 1960 ला झाली आहे. ग्रंथालयात राजकीय, ऐतिहासिक, शैक्षणिक, भैगोलिक, व्यक्तिविषयक, देवदेवकांची, संतांची, विश्‍वकोश, समाजकारणाबद्दल अशा सर्वच पुस्तकांचा खजिना ग्रंथालयात पहावयास मिळतो. असे म्हटले जाते की वाचाल तर वाचाल म्हणूनच ही वाचनाची परंपरा ओझर्डे ग्रामस्थानी फार पूर्वी पासून जपलेली आहे. सध्या मोबाईल आणि टीव्हीमुळे वाचनाची सवय कमी होत असताना ओझर्डे या गावामध्ये मात्र या ग्रंथालयाचा ज्ञान प्राप्तीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)