जयहिंद अभियांत्रिकीत महात्मा गांधी पुण्यतिथी

नारायणगाव- स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि सर्वधर्मसमभाव यावर आधारित एक नवी मानवसंस्कृती निर्माण व्हावी, यासाठी महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले .अहिंसा हाच धर्म, सत्य हेच ईश्वर आणि प्रेम हेच साधन हा महात्मा गांधिंचा मंत्र सर्वांनी सार्वजनिक जीवनात अवलंबवावा, असे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ यांनी केले. महात्मा गांधी यांच्या 71 व्या स्मृतिदिनानिमित्त कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. गरकळ बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ,संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ, तसेच सर्व विभागप्रमुख व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)