जयहिंदमधील 130 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

नारायणगाव – ग्रामीण भागातील विद्यार्थींनींना उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी व शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या सुरतवाला ट्रस्टतर्फे कुरण येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पॉलिटेक्‍नीकमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या 130 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप पुण्यातील पत्रकार भवन येथे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, पुण्यातील आचार्य आनंदऋषीजी ब्लड बॅंकेचे कार्यकारी विश्‍वस्त शांतीलाल सुरतवाला, सुरतवाला ट्रस्टचे अध्यक्ष नटवरलाल सुरतवला, चिटणीस सुरेश सुरतवाला व सुरतवाला ट्रस्टच्या पदाधिकारी उपस्थितीत होते. याबाबत जहिंदचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ म्हणालेकी, जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पॉलिटेक्‍निकमधील विद्यार्थींनींना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे. अशा प्रकारच्या सेवाभावी संस्थांनी मदत केल्यामुळेचे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी सुभाष आंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)