“जयहिंद’च्या विद्यार्थ्यांची उन्हाळी शिबीरासाठी निवड

नारायणगांव – जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कुरण आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) यांच्यात झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) येथे पार पडणाऱ्या उन्हाळी शिबिरासाठी कुरण येथील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती जयहिंद शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे यांनी दिली.
यावर्षी “सीओईपी’मध्ये या शिबिरास जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील पुढील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये संगणक विभागातील महरीन पटेल, प्राची घोडेकर, ऐश्वर्या काटे आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलि. इंजि. विभागातील प्रियांका शेटे, प्रतिक भगत या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती या निकषांवर झालेली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना “सीओईपी’मधील विविध प्रयोगशाळेमध्ये संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालक एन. एम. काळे, जयवंत घोडके, संचालिका शुभांगी गुंजाळ प्र-प्राचार्या वैशाली धेडे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)