जयश्री आंबरे सेट परीक्षा उत्तीर्ण

कोपरगाव – येथील जयश्री रामनाथ आंबरेया सेट परीक्षा उत्तीर्णझाल्या. या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून 69 हजार 186 विद्यार्थी बसले होते. त्यात 2 हजार 710 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा निकाल 3.92 टक्के लागला.

आंबरेयांना के. जे. सोमैया महाविद्यालयाचेप्राध्यापक डॉ. जे. एस. मोरे, एस. बी. दवंगे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)