“जयवंत शुगर्स’च्या वजनकाट्यावर शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर

कराड – धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स कारखाना कार्यस्थळाला शासकीय प्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीने भेट देऊन वजनकाट्याची पाहणी केली. यावेळी वजनकाट्यामध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याने जयवंत  शुगर्सचा वजनकाटा हा अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या या समितीकडून देण्यात आले. त्यामुळे जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याला शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर प्राप्त झाली आहे.

कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या 20 किलो क्षमतेच्या एकूण 6000 किलो वजनाच्या प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्‍ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा समितीने दिला. यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी ए. आर. पाटोळे, ए. बी. खटके, सतीश सोमदे, जालिंदर यादव उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)