जयवंत गुजर यांच्या निबंधाला प्रथम पारितोषिक

सहा दशकांच्या पत्रकारितेचा गौरव

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) – चिपळूण येथे होणार असलेल्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाच्या निमित्ताने राज्य पत्रकार संघटनेने आयोजित केलेल्या
निबंध स्पर्धेत येथील ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक जयवंत गुजर यांच्या निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
“समाजाला पत्रकारांची आवश्‍यकता आहे का?’ हा निबंधाचा विषय होता. संमेलनात हा निबंध वाचून दाखवला जाणार आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यंदा
जयवंत गुजर यांच्या पत्रकारितेला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. स्तंभलेखनामध्ये एकाच दैनिकात 33 वर्षे दररोज लिहिण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्या सलग पत्रकारितेचा गौरव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)