जयललिता यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता

         शशिकला यांचा चौकशी समितीसमोर गौप्यस्फोट  

चेन्नई – शशिकला यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. स्वच्छतागृहात पडल्यानंतर जयललितांनी रूग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता असं शशिकला यांनी म्हंटल आहे.

जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी  सेवानिवृत्त न्यायाधीशांची एक समिती नेमण्यात आली आहे.या समितीकडून सध्या व्ही. के.शशिकला यांची चौकशी सुरु आहे या चौकशी दरम्यान  शशिकला यांनी हा गौप्यस्फोट केलाय. शशिकला सध्या बेनामी संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

जयललिता या रूग्णालयात असताना चारवेळा व्हिडिओग्राफी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. ओ. पन्नीरसेल्वम आणि एम. तंबीदुरई यांच्यासह अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी मात्र जयललिता यांच्याशी आम्हाला तीन महिने भेटू दिले नव्हते, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)