जयललिता यांच्या रक्ताचे नमुने नसल्याचा अपोलो रुग्णालयाचा खुलासा

चेन्नई – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूला दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. जयललिता यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्क – वितर्क मांडले जातात. दरम्यान मद्रास हायकोर्टाने बुधवारी अपोलो रुग्णालयाला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या रक्ताच्या आणि जैविक नमुन्यांबाबत अहवाल द्यावा असे म्हटले होते. मात्र या मागणीच्या उत्तरादाखल आमच्याकडे जयललिता यांच्या रक्ताचे आणि जैविक नमुने नाहीत असे रूग्णालयाने म्हटले आहे.

अपोलो रूग्णालय प्रशासनाने जस्टिस एस. विद्यानाथन यांच्या मागणीनंतर हे उत्तर दिले आहे. २२ सप्टेंबर २०१६ रोजी जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ५ डिसेंबर २०१६ रोजी जयललिता यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृता नावाच्या एका मुलीने आपण जयललिता यांची मुलगी असल्याचा दावा केला. अमृताने डीएनए चाचणीचीही मागणी केली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणात आमच्याकडे जयललिता यांच्या रक्ताचे आणि जैविक नमुने नसल्याचे अपोलो रूग्णालयाने म्हटले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)