जयराम स्वामी मठाच्या विकासासाठी कटिबध्द

वडगाव : विकासकामांचा शुभारंभ करताना आमदार बाळासाहेब पाटील व मान्यवर.

आ. बाळासाहेब पाटील : वडगाव (ज. स्वा) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
पुसेसावळी, दि. 14 (प्रतिनिधी) – चारशे वर्षापासूनची परंपरा असणाऱ्या जयराम स्वामी मठाची देखभाल दुरुस्ती करणे ही काळाची गरज असून यापुढील काळातही मठ व वडगावच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मांडले. वडगाव ज.स्वा., ता. खटाव येथील जयराम स्वामी मठामध्ये श्रीकृष्ण जन्मकाळ सभा मंडपाच्या भूमिपुजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, मठाधिपती गुरुवर्य विठ्ठलस्वामी महाराज, वेताळभक्त दादा महाराज, नारायणशेठ मोहिते, अर्जुनशेठ कदम, दत्ताशेठ सावंत, सचिन गरूड, सरपंच संतोष घार्गे आदीची प्रमुख उपस्थित होती.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले की, जयराम स्वामी मठाला आतापर्यंत पन्नास लाखांच्यावर निधी दिला असून येणाऱ्या काळामध्येही या मठासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल. त्याचबरोबर या गावामध्येही आजपर्यंत लाखो रुपयांची कामे केली आहेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांनी सहकारी साखर कारखानदारीमागे उभे राहिले पाहिजे. यावर्षीही सह्याद्रिमार्फत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला देण्याचा मानस संचालक मंडळाने घेतला आहे.
समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड म्हणाले, या मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये आमदारांच्या माध्यमातून कामे झालेली आहेत. त्यामुळे आपणही त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तसेच समाजकल्याणच्या माध्यमातून मठामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे घरकुलसारखे वैयक्तिक लाभही या विभागातून गावामध्ये केलेली आहेत.
यावेळी उपसरपंच समाधान घार्गे, नंदकुमार देशमुख, राजकुमार भोसले, दत्तात्रय रुद्रुके, बाळासो वाघमोडे, निलेश पिसाळ, संजय चव्हाण, नितीन भोसले, वसंत भंडारी, वसंतराव घार्गे, मारुती पवार,अविनाश घार्गे, उमेश घार्गे, पिंटु घार्गे, रविंद्र घार्गे, हणमंत भोसले, बापु पिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)