जयपूर एक्‍स्प्रेसला सुवासरा येथे थांबा

पुणे – पुणे-जयपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या जयपूर एक्‍स्प्रेसला येत्या मंगळवारपासून मध्य प्रदेशातील सुवासरा येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पुढील सहा महिन्यांकरिता असेल, अशी माहिती देण्यात आली. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जयपूर-पुणे एक्‍स्प्रेस सुवासरा स्थानकावर दुपारी 3.11 वाजता दाखल होणार असून, पुणे-जयपूर एक्‍स्प्रेस सुवासरा रेल्वे स्थानकावर सकाळी 7.20 वाजता दाखल होईल. दरम्यान, पुणे-काझीपेठ-पुणे साप्ताहिक एक्‍स्प्रेसच्या हिंगणघाट येथील थांब्याला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी फाटक बंद
लोणी व हडपसर रेल्वे स्थानकादरम्यान असणारे मांजरी गेट देखभाल-दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद राहणार आहे. सोमवारी सकाळी 8 ते बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे फाटक रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असणार आहे. या कालावधीमध्ये वाहनचालकांनी फाटक क्रमांक 2 चा वापर करावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)