जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका – माजी मंत्री हेमंत देशमुख

धुळे – राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केला आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास जयकुमार रावल आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आरोपी करावे, अशा आशयाचे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे.

खोट्या केसेस दाखल करुन त्यात अडकवून जेलमध्ये टाकायचे. तेथे विषप्रयोग करुन किंवा अन्य अनैसर्गिक मार्गाने मृत्यू आल्यास अथवा माझ्यावर मारेकरी घालून गोळ्या घेतल्या. तर यात पहिले आरोपी जयकुमार रावल, दुसरे आरोपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करुन इतरांना आरोपी करावे, असे गंभीर आरोप हेमंत देशमुख यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जयकुमार रावल हे राज्याचे रोहयो, पर्यटनमंत्री आहेत, तर हेमंत देशमुख हे राज्याचे माजी कामगार मंत्री आहेत. हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दोंडाईचा नगर परिषदेच्या नव्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच हेमंत देशमुख समर्थकांनी या इमारतीचे उद्‌घाटन केले होते. या घटनेवरुन दोंडाईचातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौराही रद्द झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)