जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष? ;आज घोषणेची शक्यता

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

बैठकीनंतर गुलटेकडी येथील पक्षाच्या सभेत शरद पवार नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करतील. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. बैठकीत शरद पवार पक्षातील नेत्यांशी चर्चा करतील आणि आपली भूमिका मांडतील.

बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे नेते उपस्थित असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)