जयंत पाटील तुम्ही रोहित शर्मासारखी बॅटिंग करा

पुणे- रोहित शर्माने आयपीएलमध्ये जसा त्याच्या टीमला विजय मिळवून दिला, त्याप्रमाणेच आपण कॅप्टन झाल्याने आगामी निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून द्यावा, असा सोदाहरण सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला.
जयंत पाटील हे फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. कारण ते मध्येच गुगली टाकतात, असेही पवार म्हणाले.

विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही वाट्टेल ते करणार नाही, हे माहिती आहे. म्हणूनच तुम्ही पक्षाला विजय मिळवून द्यावा, असे पवार यांनी नमूद केले. तटकरे यांनीही चार वर्षे चांगली फलंदाजी केली असे म्हणत त्यांच्या प्रदेशाधक्षपद कारकीर्दीबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)