जयंती विशेष : वैज्ञानिक डॉक्टर होमी भाभा यांची कारकीर्द

भारताचे महान परमाणु वैज्ञानिक डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 मुंबईचा एक समृद्ध पारसी कुटुंबात झाला. केंब्रीज विद्यापीठात भाभांचे उच्च शिक्षण झाले. परमाणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून भाभा यांना ओळखले जाते.

मुंबईमध्ये ‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ ची स्थापना भाभा यांनी केली तसेच 1948 साली डॉक्टर भाभा यांनी भारतीय परमाणु ऊर्जा आयोगची स्थापना केली आणि आंतरराष्ट्रीय परमाणु उर्जा मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुर्भे येथे आशियातील पहिली अणुभट्टी १९५६ साली त्यांच्याच प्रयत्नाने उभारण्यात आली. भारतात अणुपर्वाची सुरुवात करणाऱ्या डॉ. भाभा यांना अणू क्षेत्रातील कामाबद्दल ‘अॅडम्स पारितोषिक’, ‘हॉपकिन्स पारितोषिक’, ‘पद्मभूषण’ इत्यादी अनेक पुरस्कार लाभले आहे. डॉक्टर भाभा यांना 5 वेळा भौतिक विषयासंदर्भात नोबेल पुरस्कार नामांकित केले गेले.

डॉ. भाभांचे चित्रकार, संगीतरसिक, वृक्षप्रेमी असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्त्व होते. बहुमुखी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉक्टर भाभा यांना नोबेल पुरस्कार पारितोषिक सर सीव्ही रमनने ‘लियोनार्दो द विंची’ उपमा दिली होती.

ऑक्टोबर 1965 ला भाभा यांनी ऑल इंडिया रेडियोद्वारे घोषणा केली जर त्यांना सूट मिळाली तर भारतात 18 महिन्याचा आत अणु बम बनविणार. त्यांचे मत होते की, ऊर्जा, कृषी आणि मेडिसिन या क्षेत्रांमध्ये शांतिपूर्ण परमाणु ऊर्जा कार्यक्रमाला सुरुवात व्हायला पाहिजे. डॉक्टर भाभा यांची मृत्यू 24 जानेवारी 1966 साली विमान दुर्घटनेत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)