जम्मू काश्‍मीरच्या पंचायत निवडणुकीवर नॅशनल कॉन्फरन्सचा बहिष्कार

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरात लवकरच होणाऱ्या पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची घोषणा नॅशनल कॉंन्फरन्स या पक्षाने केली आहे. या पक्षाचे अध्यक्ष डॉ फारूख अब्दुल्ला यांनी सांगितले की जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देण्याची तरतूद असलेल्या घटनेच्या कलमांमध्ये कोणताही फेरबदल करणार नाही अशी नि:संदिग्ध ग्वाही जो पर्यंत केंद्र सरकार देत नाही तो पर्यंत आमचा या निवडणुकांवरील बहिष्कार कायम असेल. पक्षाच्या कार्यकारणीतील बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या घटनेच्या कलम 35 अ ला आव्हान देणाऱ्या याचिकेचा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबीत आहे. सन 1954 साली अध्यक्षीय वटहुकुम काढून घटनेत ही तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार येथील नागरीकांना विशेषाधिकार मिळाले आहेत. या राज्यातील मुलीने बाहेरील राज्यातील युवकाशी विवाह केला तर या मुलीचा जम्मू काश्‍मीर मधील संपत्तीवर काही अधिकार राहणार नाही अशीही तरतूद या कायद्यात आहे. त्या तरतूदीचे पुर्ण संरक्षण व्हावे अशी या पक्षाची भूमिका आहे.

या तरतूदीलाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्याने काश्‍मीरात सध्या तणावाचे वातावरण आहे. या वातावरणात अचानकपणे प्रशासनाने पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. हा निर्णय कोणालाही विश्‍वासात न घेता घेतला गेला आहे त्यामुळे आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने जाहींर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील नगरपालिकांच्या निवडणूका ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून पंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)