जम्मू-काश्‍मीरात हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केले. ते हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. अदनान अहमद लोन आणि आदिल बिलाल बट अशी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही हिज्बुलचा म्होरक्‍या रियाझ नायकू याचे निकटवर्तीय होते.

विविध दहशतवादी कारवायांबद्दल ते सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. त्यामुळे त्यांचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठेच यश मानले जात आहे. सुरक्षा दलांनी मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्‍मीरात दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यातून मागील अवघ्या आठ दिवसांत दोन डझनहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी संघटनांच्या दृष्टीने तो मोठाच दणका आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)