जम्मू काश्‍मीरात मे पुर्वी निवडणुका

नवी दिल्ली: जम्मू काश्‍मीर मध्ये येत्या मे महिन्यापुर्वी निवडणुका घेतल्या जातील अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीच तेथे विधानसभेच्या निवडणूका घेतल्या जाऊ शकतात.

कोणतीही विधानसभा बरखास्त केली की तेथे सहा महिन्याच्या आत विधानसभेची निवडणूक घेतलीच पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा दंडक आहे. त्यामुळे तेथे मे महिन्याच्या आत निवडणुक घेणे अनिर्वाय ठरले आहे असे रावत यांनी स्पष्ट केले. राज्यपाल सत्त्यपाल मलिक यांनी बुधवारी सायंकाळी जम्मू काश्‍मीर विधानसभा बरखास्त केली आहे. काश्‍मीरातील सर्व स्थिती लक्षात घेऊन तेथे निवडणुकाच्या तारखा निश्‍चीत केल्या जातील असे ते म्हणाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)