जम्मू-काश्‍मीर – काश्‍मीर खोऱ्यातील 11 जणांच्या अपहरणाची जबाबदारी हिजबूल कमांडर रियाझ नाईकू याने घेतली आहे. गेल्या दोन दिवसात दहशतवाद्यांनी 11 जणांचे अपहरण केले आहे. हे सर्व पोलीसकर्मींचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीसांनी आपल्या नोकऱ्या सोडून द्याव्यात अशी धमकी नाईकूने दिली आहे. अपहरण केलेल्या कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही, हे त्याने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीसांनी नाईकूच्या वडिलांची चौकशी केली होती. त्याचा सूड म्हणूना पोलीसांच्या नातेवाईकांचे अपहरण करण्यात आल्याचे समजते.

नातेवाईकांचे अपहरण करून पोलीसांचे मनोबल खच्ची करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. मात्र सुरक्षा दल पलटवार करणार असून खोऱ्यातील टॉप 10 दहशतावद्यांची हिटलिस्ट तयार करण्यात आलेली आहे.

दरम्यानच्या काळात डीएसपीच्या एका नातेवाईकाला दहशतवाद्यांनी सोडून दिल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)