जम्मू काश्‍मीरातील फरारी पोलिस अधिकाऱ्याला अटक

जम्मू – खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरारी पोलिस अधिकाऱ्याला विशेष तपास पथकाने सांबा जिल्ह्यात अटक केली आहे. उपनिरीक्षक नीरज कुमार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

हा अधिकारी सुपवाल पोलिस पोस्टचा प्रमुख म्हणून काम करीत असताना त्याने आपल्या पुतण्या दलीप कुमार याला त्याच्या लॉकअप मध्ये असलेल्या काकावर हल्ला करून त्याला ठार मारण्याच्या प्रयत्नात मदत केली होती. या प्रकरणात उपनिरीक्षक नीरज कुमार सह अन्य दोघांना निलंबीत करण्यात आले होते. त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नीरजकुमार फरारी झाला होता. त्याला काल गरवाल भागात अटक करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणी दलीप कुमार याला या आधीच अटक केली आहे. दलीपकुमार याने 14 जुलैच्या रात्री कौटुंबिक वादातून त्यावेळी लॉपअप मध्ये असलेले आपले काका इंद्रजीत चौधरी यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)