जम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र घटना असणे गैर

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र घटना असणे गैर आहे असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले आहे. जम्मू काश्‍मीरच्या विशेष दर्जा विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेल्या मताला विशेष महत्व दिले जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की देशाचे सार्वभौमत्व महत्वाचे असून ते दुर्लक्षित करता येणार नाहीं किंवा त्याविषयी कोणताही गैरविचार करून चालणार नाहीं. भारत हे प्रबळ सार्वभौम राष्ट्र राहु नये असाच विचार ब्रिटीशांनी येथून जाताना केला असावा म्हणूनच त्यांनी देशात विघटनाची बिजे पेरली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ब्रिटीशांचा हा कावेबाजपणा ओळखला होंता. त्यावेळी देशात अस्तित्वात असलेली संस्थांने भारतात विलीन करण्याचा निर्णय ब्रिटीशांनी घेतला नाही.

भारतात जायचे की स्वतंत्र राहायचे याचा निर्णय ब्रिटीशांनी संस्थानांवरच सोपवला होता. त्यातून भारतात मोठी गोंधळाची स्थिती निर्माण होईल अशी ब्रिटीशांची अपेक्षा होती. पण सरदार पटेल यांनी संस्थांनांचे भारतात विलिनीकरण करून ब्रिटीशांची ही अपेक्षा खोटी ठरवली. आज साऱ्या देशासाठी एक घटना अस्तित्वात असताना जम्मू काश्‍मीरसाठी वेगळी घटना असणे गैर आहे असे मत त्यांनी या अनुषंगाने व्यक्त केले.

तथापी त्यावर त्यांनी अधिक भाष्य केले नाही. भारताला अहिंसेच्या तत्वाने स्वातंत्र्य मिळाले असे सांगितले जाते पण त्यामुळे लोकांना फारसा त्रास न होता स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळाली नाही असेही त्यांनी बोलण्याच्या ओघात नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)