जम्मू-काश्‍मीरला मिळणार नवीन राज्यपाल – व्होरांना मुदतवाढ नाही…

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरला नवीन राज्यपाल मिळण्याचे संकेत मिळ्त आहेत. गेल्या दशकाहून अधिक काळ जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल असलेल्या एन एन व्होरा (82) यांना आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार उत्सुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नवीन राज्यपालासाठी शोध चालू असून माजी गृह सचिव आणि सीएजी राजीव महर्षी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. भाजपाने पीडीपी (पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी) बरोबरच्या युती सरकारमधून सहभाग काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये 20 जूनपासून राज्यपाल राजवट चालू आहे.

भाजपा जमू-काश्‍मीरमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यास उत्सुक असली, तरी नवीन सरकार स्थापन करण्याबाबत केंद्र सरकार आणि व्होरा यांच्यात सहमती होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे कायम निवासी कोण आहेत हे ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारला देणारे कलम 35 ए हा एक कळीचा मुद्दा बनलेला आहे.

-Ads-

एन एन व्होरा यांची जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती यूपीए सरकारने केली होती. 28 जून रोजी त्यांची मुदत पूर्ण झाली, तरी मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. कारण त्याच काळात अमरनाथ यात्रेची सुरुवात होणार होती, आणि सुरक्षा मंडळाचे राज्यपाल अध्यक्ष होते.

राज्यपालपदासाठी राजकारण्याऐवजी माजी लष्कर प्रमुख वा ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यच्या निवडीची शक्‍यता आहे. सुरक्षादलांनी दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत. मेहबूबा मुफ्ती नेतृत्वाखालील सुरक्षा दलांची एकसंध कमांड अक्षरश; कोसळली होती. नवीन राज्यपाल परिस्थिती अधिक सक्षमपणे हाताळू शकतील. त्यांना दीर्घ मुदतीचा विश्‍वास देण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)