श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या जोरदार चकमकीमध्ये लष्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे 5 दहशतवादी ठार झाले. घटनास्थळी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यासाठी जमा झालेल्या युवकांपैकी एका युवकाचाही या गोळीबारामध्ये मृत्यू झाला. तर अन्य 10 जण जखमी झाले.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये गेल्यावर्षी बॅंकेच्या कॅश व्हॅनवर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याचाही समावेश होता. गेल्यावर्षी कॅशव्हॅन पळवून नेताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी आणि बॅंकेचे दोन सुरक्षा रक्षकही ठार झाले होते.

शुक्रवारी रात्री दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यातल्या काझिगुंडमधील चौगाम भागात सुरक्षा रक्षकांनी शोध मोहिम सुरू केली होती. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर ही मोहिम सुरू करण्यात आली होती.

या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केली. नंतर सुरू झालेल्या चकमकीदरम्यान 5 दहशतवादी मारले गेले. हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा हा गट होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)