जम्मू काश्‍मीरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांचा हल्ला; 4 जवान शहिद

श्रीनगर- दक्षिन काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात “सीआरपीएफ’च्या कॅम्पवर आज पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये सुरक्षा दलांचे 4 जवान शहिद झाले आणि अन्य तिघेजण जखमी झाले. सुरक्षा दलाच्या प्रवक्‍ते राजेश यादव यांनी ही माहिती दिली. घटनास्थळी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. याप्रसंगी झालेल्या चकमकीमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला असल्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले.
रात्री 2 च्या सुमारास चार सशस्त्र दहशतवाद्यांनी “सीआरपीएफ’च्या कॅम्पवर हल्ला केला. त्यांच्याकडे अंडर बॅरेल ग्रेनेड लॉंचर आणि ऍटोमॅटिक शस्त्रे होती.

उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने येथील लेथीपोराच्या परिसरात 2.10 च्या सुमारास प्रवेश केला. जम्मू-काश्‍मीर कमांडो प्रशिक्षण तळाच्या बाजूला तैनात असणाऱ्या भारतीय जवानांच्या लक्षात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे लक्षात आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दहशतवाद्यांनी सुरूवातीलाच अचानकपणे ग्रेनेड हल्ला आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केल्याने लष्कराचे काही जवान जखमी झाले होते.

सकाळी या जखमींपैकी एका जवानाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची संख्या चारवर गेली आहे. तर आतापर्यंत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जखमी झालेल्यांपैकी एका जवानाचे नाव सैफुद्दीन असे असून तो नौगाम येथील रहिवासी आहे.

काश्‍मीर खोऱ्यामध्ये तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत सुरक्षा रक्षकांना गोपनीय माहिते मिळाली होती. मात्र त्यांना गेल्या 2-3 दिवसात हल्ला करण्याची वेळ आणि संधी मिळू शकली नसावी. म्हणून त्यांनी काल रात्री हल्ला केला, असे पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठवणे थांबवत नाही, तोपर्यंत काश्‍मीरमधील सुरक्षा रक्षक आणि नागरिकांना अशाच परिस्थितीला सामोरे जायला लागेल.

“सीआरपीएफ’च्या कॅम्पमध्ये काश्‍मीरमधील दहशतवाद विरोधी कारवाईसाठीच्या दलांचे प्रशिक्षण केंद्रही आहे. जम्मू काश्‍मीर पोलिसांचे केंद्रही “सीआरपीएफ’च्या कॅम्पमध्येच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)