जम्मू काश्‍मीरमध्ये लष्कराच्या गोळीबारात गुराखी ठार 

बानिहाल (जम्मू): जम्मू काश्‍मीरमध्ये रामबान जिल्ह्यात लष्कराच्या गोळीबारामध्ये एक गुरे व्यापारी ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी लष्करी जवानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित हालचाल असलेल्या लोकांना हटकल्यावर जवानांवर हल्ला करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराच्यावतीने गोळीबार करण्यात आल्याचे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.
मोहम्मद रफिक गुज्जर असे मरण पावलेल्या 28 वर्षीय गुरे व्यापाऱ्याचे नाव आहे. तर त्याच्याबरोबरचा शकील अहमद (30) हा या गोळीबारामध्ये जखमी झाला झाहे. हे दोघेही गूल भागातील रहिवासी होते. काल पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 58 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी कोहिली गावातून जात असताना ही घटना घडली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या गोळीबारामध्ये गुज्जर हा जागीच ठार झाला तर जखमी अहमदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही आपल्या व्यवसायाच्यानिमित्ताने कोहिली गावात आले होते.
कोहिली भागात काही संशयास्पद हालचाली दिसत असल्याचे समजल्यावर लष्कराच्यावतीने ही कारवाई करण्यात आली होती. काही संशयितांना हटकल्यावर त्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्याला लष्कराने गोळीबाराने प्रत्युत्तर दिले, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)