जम्मू काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

नवी दिल्ली: जम्मू काश्‍मीरमध्ये राज्यपाल राजवटीची सहा महिन्यांची मुदत पूर्ण झाल्यामुळे आज मध्यरात्रीपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या संदर्भातील शासकीय आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. जून महिन्यात पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा भाजपने काढल्यापासून राज्यपाल राजवट लागू झाली होती.

या राज्यपाल राजवटीबाबतचा अहवाल राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्राकदे पाठवला होता. जम्मू काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शिफारसींचा विचार करून राष्ट्रपती राजवटीबाबत निर्णय घेण्यात आला होता.

जम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना असल्यामुळे राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केल्यावर सहा महिने राज्यपाल राजवट अनिवार्य आहे. त्यानंतरच राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)