जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले

पुलवामात 2 जवान शहीद, अनंतनागमध्ये 11 जण जखमी
श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये आज झालेल्या दोन दहशतवादी हल्लात पुलवामा येथे 2 जवान शहीद, तर अनंतनाग येथे 11 जण जखमी झाले. दक्षिण काश्‍मीरमध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले घडवून आणले. या हल्ल्यात पुन्हा एकदा सुरक्षा दलावर निशाणा साधण्यात आला.

दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील कोर्ट कॉम्पलेक्‍सच्या पोलीस गार्ड पोस्टवर मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करत अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात चौकी बाहेर ड्यूटी बजावत असलेले दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले. हा हल्ला होताच अन्य जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे 20 मिनीटांपर्यंत दोन्ही बाजूने बेछुट गोळीबार झाल्यानंतर दहशथवाद्यांनी पलायन केले. मात्र, दहशतवाद्यांनी जाताना शहीद पोलिसांच्या दोन एसाल्ट रायफल्स्‌ घेऊन पळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रेड कॉंस्टेबल गुलाम रसूल आणि गुलाम हसन असे शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत. तर मंजूर अहमद हे जखमी झाले आहेत, अशी माहिती पुलवामाचे एसएसपी मोहम्मद असमल चौधरी यांनी दिली. या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून दहशवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)