जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांकडून कॉंग्रेस नेत्याची हत्या

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी पटेल यांची आज दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या दुर्घटनेत त्यांचे दोन सुरक्षा रक्षकही जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या गुलाम नबी पटेल यांना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांच्या मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणी काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा चौकजवळ दहशतवाद्यांनी गुलाम नबी पटेल यांच्यावर जीवघेणे हल्ला केला. यात दहशतवाद्यांनी तिघा जणांवर गोळीबार करत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर पटेल यांच्यासह जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पटेल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. अन्य दोघा जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, गुलाम नबी पटेल हे पूर्वी राज्यातील सत्तारूढ पीपल्स डेमोक्रेटिक पक्षात होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पटेल यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)