जम्मू-काश्‍मीरमध्ये दरीत बस कोसळून 17 ठार,16 जखमी

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): जम्मू-काश्‍मीरमध्ये मिनि बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 17 ठार,16 जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. किश्‍तवाड जिल्ह्यातील ठाकरी येथे शुक्रवारी ही दुर्घटना घडली. ही मिनिबस किश्‍तवाडहून केशवानला जात होती. सकाळी दहाच्या सुमारास ठाकरी येथे ड्रायव्हरचे मिनि बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्ता सोडून ती 300 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी स्थानिक लोकांच्या सहायाने मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या 16 जणांपैकी 11 गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने जम्मू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजिंदर गुप्ता यांनी दिली आहे.

सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. गेल्या महिनाभरात किश्‍तवाड जिल्ह्यात झालेला हा तिसरा मोठा अपघात आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)